यावल: बामणोद येथे आमोदा रोडवर पवन ट्रेडिंग कंपनीत चोरी,७७ हजार ५९५ रुपयाचा मुद्देमाल लांबवला,फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल
Yawal, Jalgaon | Sep 16, 2025 यावल तालुक्यात बामणोद हे गाव आहे. या गावातून आमोदाकडे जाणारा रस्त्यावर पवन ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीच्या गोदामातून अज्ञात चोरट्याने विविध साहित्य चोरी केले. यात प्रामुख्याने बॅटरी इन्वर्टर ड्रिल मशीन सह आदी साहित्यांचा समावेश होता. येथून एकूण ७७ हजार ५९५ रुपयाचा मुद्देमाल चोरी झाला तेव्हा याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.