नागपूर शहर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा फेटाळली; सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण
नागपूर दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाबाबतच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. यावर शरद पवार किंवा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, देशातील वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या प्रश्नावर पंतप्रधानांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणीही त्यांनी केली.