नागपूर शहर: खापरखेडा येथे भीषण अपघात: आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू
खापरखेडा-कामठी मार्गावर टायर फुटल्याने कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. आणि दुचाकी ला काही दूरपर्यंत फरफटत नेले या अपघातात ३६ वर्षीय आयटी इंजिनिअर अश्विन आनंद गजभिये यांचा जागीच मृत्यू झाला.१ जून रोजी रात्री ९:३० च्या सुमारास महाराष्ट्र विद्यालयासमोर ही घटना घडली.अश्विन हे मूळचे खापरखेडा येथील असून बेंगळुरूमध्ये नोकरी करत होते, सध्या ते 'वर्क फ्रॉम होम' करत होते