नागपूर शहर: कळमना पोलिसांकडून घरफोडीचा पर्दाफाश; दोन कुख्यात चोरट्यांना अटक: प्रवीण काळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी 29 मे ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार,कळमना पोलिसांनी मिनीमाता नगर भागात झालेल्या घरफोडीचा छडा लावत दोन कुख्यात चोरट्यांना अटक केली आहे. अश्विन लालताप कुमार मिश्रा आणि हिमांशु सतीश मुनि अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली आहे.