औंढा नागनाथ: येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात काकडा भजनाने वातावरण भक्तीमय
औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथ मंदिरात कार्तिक महिन्या निमित्त दररोज सकाळी पाच ते सात या दरम्यान काकडा भजन आरती होत आहे यामध्ये भारुड,गवळणी भक्ती गीते गायल्या जात आहेत या भजनाने शहरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. अश्विन शुद्ध पौर्णिमेपासून काकडा भजन सुरू झाले ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणार आसून या भजनाचे विशेष महत्त्व असल्याचे पुरोहित निळकंठ देव यांनी दिनांक ११ ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी ९ वाजता बोलताना सांगितले यावेळी उत्तमराव देशमुख,महंत शामगिरी महाराज उपस्थित होते.