भाजपचे नेते आणि तुमसरचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण केलेल्या कामांचा आणि पक्षावरील विश्वासाचा पुनरुच्चार केला. त्यांनी नमूद केले की, २०१७ ते २०२२ या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी तुमसर शहरात 'भरपूर मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे' केली आणि अडीच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी इतका निधी आणला, जो यापूर्वी कोणीही आणू शकला नव्हता. "इतका विकास केला की त्याची काही लिमिटच नाही," असे ते...