औंढा नागनाथ: पेरजाबाद येथे बनावट कागदपत्रा आधारे मतदान यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न ग्रामस्थांचे तहसील कार्यालय येथे निवेदन
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे बनवून मतदान यादीत नाव समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याने याबाबत ग्रामस्थांनी दिनांक 2 डिसेंबर मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता औंढा नागनाथ तहसील कार्यालय येथे तहसीलदार हरीश गाडे यांच्याकडे निवेदन देत कागदपत्राची चौकशी करून सदरील नाव गावच्या मतदान यादीत समाविष्ट करू नये अशी मागणी केली. निवेदनावर हरिश्चंद्र आव्हाड, विश्वनाथ वाघ, श्रीरंग आव्हाड,कुंडलिक मात्रे,चांदू मात्रे,परमेश सांगळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत