स्थानिक गुन्हे शाखा भंडारा व तुमसर पोलिसांनी खैरलांजी शिवार डोंगरला नाल्याजवळ दि. २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास छापा टाकून बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत मोहगाव खदान येथील प्रणय अजय रंगारी (१९) याला ताब्यात घेऊन ८ लाख रुपये किमतीचा स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉलीसह १ ब्रास रेती असा एकूण ८ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.उप.नि. पाटील यांच्या तक्रारीवरून तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.