साक्री तालुक्यातील गणेशपुर येथे कांदे भरलेले ट्रॅक्टर ट्रॉली सह विहिरीत कोसळले. ट्रॅक्टर वर खेळत असलेले तीन बालके ही विहिरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी एका बालकाला वाचवण्यात यश आले असून दोन बालीकांचा शोध घेण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. घटनेची माहिती मिळताच साक्री पोलीस ठाण्याचे पी आय दीपक वळवी व त्यांचे पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस प्रशासनाकडून बेपत्ता बालिकांचा शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.