अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे एका तरुणाला आपली किडनी विकावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर गावातील रोशन कुडे (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपाखाली ही कारवाई केली आहे.या गंभीर प्रकरणाची दखल घेत स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका, अपर पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस पथकाने नागभीड येथे ठाण मांडले असून तपास वेगाने