नागपूर शहर: मुलीच्या जन्मानंतर छळ आणि 'तीन तलाक'; पतीसह सासूवर गुन्हा तहसील ठाण्यात गुन्हा दाखल
11 मे ला दुपारी 3:30 ला मिळालेल्या माहितीनुसार तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मस्कासाथ परिसरात एका महिलेला मुलीच्या जन्मानंतर सासरच्या मंडळींकडून क्रूर वागणूक आणि 'तीन तलाक' दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित रुखसार शेख हिच्या तक्रारीवरून पती इमरान रशीद शेख आणि सासू सईदा बेगम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.