यावल शहरातील बोरावल रस्त्यावर पाटचारी जवळ तुषार तायडे वय १९ या तरुणाला रस्ता अडून इंस्टाग्राम वर टाकलेल्या व्हिडिओच्या रागातून मारहाण करण्यात आली होती त्यात त्याचा मृत्यू झाला होता. तेव्हा या खून प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तर यावल पोलिसांनी जळगाव गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाच्या मदतीने पाच जणांना अटक केली व त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता सर्वांना १० डिसेंबर पर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.