नागपूर शहर: जास्त व्याजाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक; महिला आरोपीला अटक: हरेश काळसेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 4 मे ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार 'महिला बचत फंड कार्ड'च्या नावाखाली अनेक कष्टकरी महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या गीता सुनील धामने या महिलेला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.