मुमुक्षू रत्ना साक्षी नरेंद्रजी बैद (रा. हिंगणघाट) यांच्या वर्षीदान (वरघोडा) सोहळ्यानिमित्त धामणगाव रेल्वे येथे जैन समाजाच्या वतीने भव्य व भावपूर्ण स्वागत करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण शहरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मुमुक्षू रत्ना साक्षी बैद या उच्चशिक्षित असून त्यांनी बी.एस्सी., एम.एस्सी. तसेच पीएच.डी. (फिजिक्स) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय त्यांनी अमेरिकेत विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र (फिजिक्स) विषयाचे अध्यापनही केले आहे. उच्च शिक्षण, उत्तम करिअर आण