परभणी शहरातील वसमत रोडवरील एमआयडीसी कॉर्नर परिसरात चारचाकी वाहनातून पाच जनावरांची दाटीवाटीने वाहतूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी कारवाई करत संबंधित वाहन जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी पांडुरंग जाधव यांच्या फिर्यादीवरून वाहन चालकाविरोधात नवा मोंढा पोलीसात आज शुक्रवार 19 डिसेंबर रोजी 12 30 वाजता गुन्हा दाखल.