कार्यकर्त्यांच्या भावना झाल्या अनावर.. आर्वी येथील राष्ट्रवादी(अजितदादा) संपर्क कार्यालयात अजित दादांना श्रद्धांजली..
Arvi, Wardha | Jan 28, 2026 आर्वी येथे अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले होते आमचा देव हरवला आमचा आधार हरपला अशा शब्दात भावना व्यक्त करण्यात आला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित दादा पवार यांच्या विमानाला आज झालेल्या दुर्घटनेत त्यांच्या मृत्यूची बातमी अंगावर काटा आणणारी होती कार्यकर्त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले होते दिलीप पोटफोडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जनसंपर्क कार्यालयात दुपारी दादा नसल्याचे कोणीच मान्य करायला तयार नव्हते...