लातूर: मांजरा धरणाची दोन गेट उघडली; नदीकाठच्या नागरिकांनी घ्यावी काळजी
Latur, Latur | Oct 29, 2025 मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाढत्या येव्याचा विचार करून आज दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 7.00 वाजता गेट क्रमांक 1 आणि 6 अशी दोन गेट उचलण्यात आली आहेत, अशी माहिती मांजरा प्रकल्प धनेगाव पुरनियंत्रण कक्ष यांनी दिली आहे. सद्यस्थितीत, धरणाच्या सांडव्यातून दोन वक्रद्वारे (क्र. 1 व 6) 0.25 मीटर उंचीवरून पाण्याचा विसर्ग सुरू असून सध्या 1747.14 क्युसेक्स (49.48 क्युमेक्स) इतके पाणी मांजरा नदीपात्रात सोडले जात आहे.