सुधागड: पाली भागातील जंगलाला भीषण आग ? रानमेवा, कंदमुळे नष्ट
कर्जत तालुक्यातील पाली परिसरातील साई डोंगर भागात प्रस्तावित टोरंट पॉवर पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून स्थानिक आदिवासी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकल्पासाठी जंगलाला आग लावून आदिवासींच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांनी टोरंट कंपनीवर केला आहे. केंद्र सरकारकडून खासगी स्वरूपातील टोरंट पॉवर पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, या प्रकल्पासाठी वन विभागाची सुमारे 640 एकर जमीन कंपनीला देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.