नागपूर शहर: रॅपिडो चालकाला लुटणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; मोबाईल आणि रोख रक्कम जप्त
17 मे ला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार एका रॅपिडो चालकाला अडवून त्याला बेदम मारहाण करत त्याचे दोन मोबाईल आणि रोख रक्कम लुटणाऱ्या पाच अट्टल गुन्हेगारांना नागपूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात लुटलेला मोबाईल देखील जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध पारडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.