तिरोडा: जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर तिरोडा येथे प्रथम आगमन निमित्ताने रविकांत बोपचे यांचे तिरोडा शहरात जंगी स्वागत
Tirora, Gondia | Oct 15, 2025 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त गोंदिया जिल्हा अध्यक्ष श्री रविकांत बोपचे यांचे प्रथम आगमन प्रसंगी तिरोडा शहरात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी शहरातील सहकार नगर चौक ते जनसंपर्क कार्यालय पर्यंत बाईक रॅली काढून, फटाके फोडून, फुलांच्या वर्षावात आणि ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.