लातूर: मनावर घेतलं तर निश्चितपणे बदल घडू शकतो हे रमेशआप्पांच्या माध्यमातून जनतेने दाखवून दिले- पालकमंत्री ना.भोसले
Latur, Latur | Sep 17, 2025 लातूर -कोणतेही अभियान राबवण्याची ताकद जनतेत आहे मनावर घेतले तर बदल घडू शकतो हे जनतेनी रमेशआप्पांच्या माध्यमातून पंधरा वर्षाचा बदल घडून दाखवला तेव्हा गावच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रगतीसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान यशस्वीपणे राबवून निवळी ग्रामस्थांनी पहिल्या क्रमांकाचे पाच कोटींचे बक्षीस जिंकण्याचे लक्ष ठेवून प्रयत्न करावेत असे आव्हान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.