राधिका सेलिब्रेशन हॉल येथे महात्मा फुले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास अंजनगाव दर्यापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार गजानन लवटे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल व बोधचिन्ह देऊन आज दुपारी ४:३० वाजता गौरव केला.यावेळी आमदार गजानन लवटे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.