दक्षिण सोलापूर: आषाढी एकादशीच्या निमित्ताने गंगेवाडी शाळेत उत्साहात दिंडी सोहळा, विद्यार्थ्यांनी साकारली विठ्ठल-रुक्माई...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशीचा पारंपरिक दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेत गावभर प्रदक्षिणा घालत पारंपरिक दिंडी साकारली. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्माईच्या वेशभूषेतून सजीव रूप साकारत पालखी, फुगडी, गोल रिंगण आणि भक्तिरसपूर्ण अभंगांनी गावातील वातावरण भक्तिमय केले. संपूर्ण गाव ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजराने दुमदुमून गेले.