कराड: कराडच्या लोकन्यायालयामध्ये बापलेकाच्या मनोमिलनामुळे न्यायाधीश देखील गहिवरले; सव्वा सहा कोटी रुपयांची तडजोड रक्कम वसूल
Karad, Satara | Sep 14, 2025 चार वर्षांपासून एकमेकाचे तोंडही न पाहणारे बाप लेक कराडमध्ये लोकन्यायालयाच्या माध्यमातून एकत्र आले अन् दोघातील कटुता संपवून एकमेकाला घट्ट मिठी मारत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. मुलाने चूक मान्य करून वडिलांचे पाय धरले तर वडिलांनीही माझे चुकले असे सांगत मुलाची समजूत काढली, हे मनोमिलन पाहून न्यायाधीशांचे डोळेही पाणवले आणि चार वर्षांचा दुरावा एका लोकन्यायालयात संपुष्टात आला. एकमेकांविरुद्ध असणाऱ्या फौजदारी आणि दिवाणी खटले एका मिनिटात काढून घेत दोघांनी एकत्र आयुष्यभर राहण्याची शपथ घेतली.