वर्तक नगर येथून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर रिक्षा चालक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिपीन सिंह असे त्यांचे नाव असून आज दिनांक 6 जानेवारी रोजी सकाळी 11च्या सुमारास त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी पूर्व नगरसेवकांवर आरोप केले आहेत. चारही नगरसेवकांनी सुभाष नगरसाठी काहीच केलं नाही असं त्यांनी सांगितलं.