नागपूर शहर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धमकी प्रकरण: जयेश पुजारीसह दोघांना ५ वर्षे सश्रम कारावास; नागपूर न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटींची खंडणी मागणाऱ्या आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपींना नागपूरच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. मुख्य आरोपी जयेश पुजारी आणि अफसर पाशा यांना विविध कलमांखाली सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ५५ दिवसांत या खटल्याचा निकाल लागला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. अनिलकुमार के. शर्मा यांनी हा निकाल दिला.