शाहूवाडी: पाटणे गावात पणतीला लागलेली साडी: ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू
पाटणे येथील मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ८० वर्षीय इंदुबाई यादव यांना पणतीची आग साडीवर लागल्याने जखमी झाल्या. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद सीपीआरमध्ये करण्यात आली आहे.