मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यापुढे देखील सुरू राहणार आणि त्यासाठी 418 कोटी रुपये निधी देण्यात आला अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. एक लाख 26 हजार प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नांवर आमदार डॉ राहुल पाटील यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडत याबाबत लक्षवेधी उपस्थित केल्यानंतर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हे उत्तर आज रविवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 10 35 वाजता विधानसभेत दिले.