कवठे महांकाळ: जत ते कवठेमंकाळ मार्गावर रांजनी फाट्याजवळ अपघातात एक जण जखमी
कवठेमहांकाळ ते जत या मार्गावर आज 15 ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात महेश ज्ञानू पाटील (वय 52) हे मोटरसायकलवरून पडून गंभीर जखमी झाले. पाटील हे जतच्या दिशेने जात असताना रस्त्यावरून तोल जाऊन थेट डांबरी रस्त्यावर आपटले, यात त्यांच्या डाव्या हातास गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षण रस्त्यावर गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या वाहनचालकांनी तत्परता दाखवत पाटील यांना तातडीने जत येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले