नागपूर शहर: आता वाट पाहण्याची गरज नाही ,तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या; प्रशासनाचे कडक निर्देश
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने प्रशासनाला मोठे निर्देश दिले आहेत. "शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा आणि त्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळवून द्या," असे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.