अमरावती ते शिरजगाव मोझरी बस सेवा तत्काळ सुरू करा-परिसरातील गावकरी, विद्यार्थी व कामगार यांची एकमुखी मागणी व आंदोलनाचा इशारा, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी दिली आहे.अमरावती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागात जळका शहापूर,सावर्डी, शेंदोळा, शिरजगाव येथील गावकरी,सरपंच, विद्यार्थी यांनी गेल्या 6 महिन्यापासून बंद असलेली अमरावती ते शिरजगाव बस सेवा सुरू करण्याची मागणी केली.