नागपूर शहर: कपिलनगरमध्ये सिगारेटवरून वाद; युवकावर प्राणघातक हल्ला, पोलिसांकडून आरोपींची धिंड
25 एप्रिलला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'हायवे बार अँड रेस्टोरंट'मध्ये सिगारेट मागण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. या वादादरम्यान, यशोधरा नगर येथे राहणाऱ्या शेख अकील या युवकावर काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला.कपिलनगर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत सर्व आरोपींना ताब्यात घेतले. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, गुन्हेगारांचे धाबे दणाणण्यासाठी पोलिसांनी एक कडक पाऊल उचलले.