अलिबाग: रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या 'वन बुरुजा'ची डागडुजी
Alibag, Raigad | Jun 29, 2026 रेवदंडा आगरकोट किल्ल्याच्या उत्तर प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक 'वन बुरुज'च्या संवर्धनासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने हाती घेतलेले डागडुजी व दुरुस्तीचे काम सध्या वेगाने सुरू असून, जीर्ण अवस्थेत पोहोचलेल्या या ऐतिहासिक वास्तूला नवसंजीवनी मिळत आहे. शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असलेल्या या कामामुळे रेवदंड्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन होण्यास मोठी मदत होणार आहे. १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी उभारलेल्या आगरकोट किल्ल्याच्या या भव्य प्रवेशद्वाराने अनेक ऐतिहासिक घडामोडींची साक्ष दिली आहे.