छत्तीसगडचे अमित बघेल यांनी सोशल मीडियावर सिंधी समाजाच्या इष्टदेवता श्री साई झुलेलाल आणि संपूर्ण सिंधी समाजाविरुद्ध आक्षेपार्ह व अपमानजनक वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओनंतर देशभरातील सिंधी समाजामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अकोल्यातील सिंधी समाजाने या वक्तव्याचा तीव्र निषेध करत १५३अ, २९५अ, ५०० आणि ५०५(२) या कलमांखाली गुन्हा दाखल करून संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली आहे. समाजाने शांततेचा संदेश देत अशा भडकाऊ विधानांवर तातडीने नियंत्रण आणावे.