नागपूर शहर: खोब्रागडे चौक येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या व्यक्तीचा उपचार दरम्यान मृत्यू
30 मे ला रात्री 8 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे जरीपटका हद्दीतील खोब्रागडे चौक येथे चाळीस वर्षे व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळले होते त्यांना उपचाराकरिता शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे हा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे