सातारा: सातारा येथील दसरा व सिमोल्लंघन सोहळा नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा होणार : पालकमंत्री शंभूराज देसाई
Satara, Satara | Sep 29, 2025 सातारा येथील शाही दसरा महोत्सवाच्या भव्य आयोजनासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली होती, तथापि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यातील विविध ठिकाणी उद्भवलेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा ऐतिहासिक शाही विजयादशमी व सिमोल्लंघन सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे हा सोहळा पारंपारिक पद्धतीने साधेपणाने साजरा होणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले.