नागपूर शहर: गणेशपेठ भागातील ओयो हॉटेलवर छापा, देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
नागपूर शहरात 'ऑपरेशन शक्ती' या मोहिमेअंतर्गत गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने मोठी कारवाई करत एका देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओयो फ्लॅगशिप कृष्णा हॉटेल'येथे ऑनलाईन संपर्काद्वारे देहव्यापार चालवला जात असल्याचे समोर आले.पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता, 'राज' नावाचा आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना जागा उपलब्ध करून देऊन पीडित मुलींकडून देहव्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले.