बेलाटी गावात हद्दपार करण्यात आलेल्या इसमाने आदेशाचे उल्लंघन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पालांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 04 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7.40 वाजताच्या सुमारास मौजा बेलाटी येथे गणेश प्रेमदास कायारकर (वय 24 वर्ष, रा. बेलाटी, ता. लाखांदूर, जि. भंडारा) हा आपल्या राहत्या घरी उपस्थित असल्याचे आढळले.