सावंतवाडी: सिंधुदुर्गात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांसमोर नवीन संकट
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाचा यलो अलर्ट लागू असून, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. विजांचा कडकडाट, वेगवान वारे आणि मुसळधार पावसाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला असून, पुढील दोन दिवस जिल्ह्यात सतर्कतेची गरज आहे.