नाशिक: इंदिरानगर भागातील केब्रिज स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल; पालक व शिक्षकांमध्ये खळबळ
Nashik, Nashik | Sep 15, 2025 इंदिरानगर येथील केंब्रिज स्कूलला एक ईमेल प्राप्त झाला.या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारात तीन बॉम्ब ठेवले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली.मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला.पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक व श्वान पथकाला घटनास्थळी बोलावले. दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने घरी पाठवण्यात आले.