औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील रांजाळा रोड लगत एका टीनशेड मध्ये शासनाने प्रतिबंध घातलेल्या व मानवी शरीरास अपायकारक असलेल्या गुटख्याची अवैध गुटख्याची विक्री सुरू असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना मिळाली होती यानंतर पोलीस निरीक्षक जीएस राहिरे,जवळा बाजार पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत, जमादार गजानन गिरी, जमादार इम्रानोद्दीन सिद्दिकी, जमादार दिलीप नाईक यांनी दिनांक आठ डिसेंबर सोमवार रोजी रात्री दहा वाजे दरम्यान अचानक धाड टाकली