ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अहिल्यानगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघाचे खासदार नीलेश लंके यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पारनेर तालुका व आसपासच्या ग्रामपंचायतींमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या नव्या इमारती व पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे