भंडारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत "अरुणोदय - सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान" राबविण्यात येणार आहे. सिकलसेल सारख्या गंभीर आजाराचे वेळीच निदान होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ही व्यापक मोहीम हाती घेतली असून, याअंतर्गत ठिकठिकाणी तपासणी व जनजागृती कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या मोहिमेला पाठबळ देत आमदार राजु कारेमोरे यांनी जनतेला या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन १२ जानेवारी रोजी रात्री ८ वा. केले आहे.