नागपूर शहर: नागपुरात एम.डी. पावडरसह तरुण अटकेत
28 जूनला दुपारी 4:30 ला मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या इमामवाडा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कारवाई करत एका तरुणाला अटक केली आहे.इमामवाडा पोलिसांनी गस्तीदरम्यान चारखंबा चौक परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या राज मुकेश बक्सरे (वय १९) याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ६०,००० रुपये किमतीची ०६.४४ ग्रॅम एम.डी. पावडर सापडली. आरोपीने ही पावडर आरिफ खान पठाण याच्या मदतीने विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले असून, पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दा