नागपूर शहर: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावावर हल्ला करणाऱ्या आरोपीला वर्षभरासाठी 'प्रोबेशन'
शुल्लक कारणावरून सख्खा भाऊ आणि वहिनीवर वस्तऱ्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला नागपूर जिल्हा न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश एन. एच. जाधव यांनी आरोपी राजेंद्र उर्फ राजू दत्तूजी जिचकार याला एक वर्ष चांगल्या वर्तणुकीच्या अटीवर (कलम ३२४ अन्वये) आणि ३०,००० रुपयांच्या जामीनपत्रावर सोडण्याचे आदेश दिले आहेत.३० जून २०२० रोजी कपिलनगर हद्दीत ही घटना घडली होती.