नागपूर शहर: मराठा आणि ओबीसी आरक्षणावर सरकारची भूमिका सकारात्मक: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची भूमिका नेहमीच सकारात्मक आणि पारदर्शक राहिली आहे, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सरकारने आतापर्यंत या विषयावर वारंवार निर्णय घेतले आहेत आणि यापुढेही समाजाच्या हिताचे निर्णय घेतले जातील.