नागपूर शहर: नागपूर सायबर पोलिसांची मोठी कारवाई: 'डिजिटल अरेस्ट' झालेल्या वृद्ध दाम्पत्याचे १३ लाख परत: योगेश घारे वरिष्ठ पोलीस निरीक
सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी 30 एप्रिलला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार,आतंकवाद्यांशी संबंध असल्याचा बनाव रचून 'डिजिटल अरेस्ट'द्वारे १३ लाखांची फसवणूक झालेल्या वृद्ध दाम्पत्याला नागपूर सायबर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत ठगांच्या खात्यातील संपूर्ण रक्कम गोठवली आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर ती दाम्पत्याला परत मिळवून दिली. याबद्दलचे अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश घारे यांनी दिली आहे.