नागपूर शहर: नागपुरात सासरच्या व्यक्तीची हत्या, आरोपी गजाआड
5 जुलै दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या मानकापूर परिसरात राहणाऱ्या मेहताबसिंग सोहनलाल चौधरी (वय ४३) यांची अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. गुन्हे शाखा युनिट ५ ने तांत्रिक तपास करून अवघ्या काही काळातच आरोपी रोहित हरीप्रसाद गौतम याला अटक केली.मृत व्यक्ती आपली मुलगी पल्लवी हिला तिच्या पहिल्या पतीकडे जाण्यासाठी वारंवार आग्रह करत होती, याच रागातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.