नागपूर शहर: कळमना येथील खुनाचा थरारक सीसीटीव्ही फुटेज आला समोर
26 एप्रिल ला सायंकाळी 6 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार कळमना येथे शुल्लक कारणावरून वाद करत एका युवकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तांत्रिक माध्यमाच्या सहाय्याने तपास करून एका आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्या आधारे पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहे.