क्रिप्टो करेन्सी गुंतवणुकीवर भरघोस परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला तब्बल १ कोटी सदतीस लाख 64 हजाराने गंडा घातला ही गंभीर घटना राळेगाव येथे 3 जानेवारी रोजी उघडकीस आली. या प्रकरणी राळेगाव पोलिसांनी एका महिलेसह अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.